Welfare Activities

आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर @SP_Washim येथे वाशिम पोलीस येथील महिला अंमलदार करिता 'झुंबा' कार्यशाळेचे आयोजन उमेश फिटनेस स्टुडिओ यांचे वतीने करण्यात आले होते. यावेळी सौ. पोलीस अधीक्षक श्रीमती शिरिषा सिंह यांनी पोषक आहार व निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

वाशीम जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन येथे महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनची सूत्रे महिलांच्या हाती दिली तसेच त्यांचा सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

वाशिम पोलीस दलातील वार्षिक गोळीबार सराव सुरू असून सदर गोळीबार सरावामध्ये एकूण तीन पुरुष पोलीस अंमलदार व तीन महिला पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्ट फायरिंग केल्याने एकूण 06 पोलीस अंमलदार यांचा मा. पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

वाशिम पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार संगीता ढोले ब न 1200 यांनी पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आणि निलोफर शेख ब न 1416 यांनी रौप्यपदक जिंकले असून या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मा. पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी ताण-तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न,

पोलिस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचे करीता ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली असून याकरिता एकूण 40 पोलीस कुटुंबीय हजर होते. यावेळी पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी पोलीस कुटुंबीयांसोबत संवाद साधला आणि त्यांचे अडचणी बद्दल विचारपूस केली.

बुस्टर डोस लसीकरण

मा. पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी Covid 19 चे दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या अधिकारी अंमलदार यांना बूस्टर डोस देण्यात आला असून या लसीकरणाच्या कॅम्पमध्ये एकूण 301 अधिकारी/ अंमलदार यांनी सहभाग घेतला.#BoosterDose

दि.१४/०१/२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात मकर संक्रांती साजरी करण्यात आली.

दि.१४/०१/२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात मकर संक्रांती साजरी करण्यात आली.

नववर्ष स्वागत

मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी नववर्षाचे स्वागत वाशिम पोलीस दलातील पोलीस बांधवांसोबत केले. यावेळी पोलीस अंमलदार यांचे हस्ते केक कापून अधिकारी/अंमलदार व कुटुंबीयांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. #HappyNewYear2022 #CopLife #Celebration_with_families

SP कार्य़ालयात आज संविधान दिनाचे निमित्ताने निबंध, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेतल्या

पोलीस कल्याण सप्तांहंअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन