Positive Stories



०१ - फेब्रुवारी - २०२५
दि.२७ ते ०१ः०२ः२५ पावेतो सायबर तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण संपन्न.
जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकारी व ३३ पोलीस अंमलदार यांना सायबर च्या बाबतीत प्राथमिक-मध्यम तसेच प्रगत स्तरावर विविध तज्ञाकडुन मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये तांत्रिक विशलेषण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकसह ट्रेनिंग देण्यात आले. सर्वांची लेखी परीक्षा घेऊन प्रथम तीन अधिकारी व प्रथम तीन अंमलदार यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. मा.पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतुन वाशीम जिल्ह्यातील पहिल्यांदा तांत्रिक कौशल्यावर आधारित सायबर प्रशिक्षण संपन्न झाले .

२१ - जानेवारी - २०२५
पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांची उत्कृष्ट कार्यवाही ,12 तासाच्या आत अल्पवयीन मुलीचा शोध .
पोलीस स्टेशन मंगरुळपीर कलम 64,65(1)65(2) 137(2) BNS सहकलम 4,6 पोक्सो या गुन्ह्यातील बेपत्ता 13 वर्ष वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा तांत्रिक आणि उत्कृष्ट विचारपूस कौशाल्याद्वारे अवघ्या 12 तासाच्या आत घेण्यात शोध घेण्यात मंगरुळपीर पोलीस स्टेशनला यश मिळाले .



