Skip to main content
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police emblem — Washim PoliceWashim PoliceMaharashtra Police
  • Home
  • Contact Us

Washim Police

Washim Police

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

Site Map|Disclaimer|Terms & Conditions|Privacy Policy|Last Updated: 24 November 2026 at 12:00 pm
About UsLeadershipOrg Structure
E-Challan PaymentFile FIR OnlinePolice Clearance
Police Helpline: 112Helpline: 1090Women Helpline: 1091Child Helpline: 1098Mobile / WhatsApp: +918605878254Control Room: 0725-2234834
Missing PersonsComplaintsFeedback
RTITendersRecruitment
Contact UsEmail
Visitors 3,285
Washim Police

© 2026 Washim Police. All rights reserved.

Designed & Developed by Dreamcare Developers

Initiatives

Police projects and community policing programmes.

All InitiativesPolice StationsSpecial BranchesSP and SDPO Offices
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरात येथे आयोजित एकता परेडच्या प्रक्षेपणाचे आयोजन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरात येथे आयोजित एकता परेडच्या प्रक्षेपणाचे आयोजन

पोलीस स्टेशन रिसोडच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या एकता परेडचे प्रक्षेपण नगरपरिषद हॉल, रिसोड येथे प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आले. सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, एनसीसी विद्यार्थी, पोलीस मित्र तसेच इतर विद्यार्थी असे एकूण 30 जण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना राष्ट्रीय एकता, अखंडता व बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

बिरबलनाथ क्रिकेट क्लब व पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड आयोजित

बिरबलनाथ क्रिकेट क्लब व पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड आयोजित

बिरबलनाथ क्रिकेट क्लब व पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी एकता दौडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये एकता, बंधुभाव व सामाजिक सलोखा वाढविणे हा आहे.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 31/10/2026 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन रिसोडच्या वतीने एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर दौडीची सुरुवात सकाळी 07:00 वाजता पोलीस स्टेशन रिसोड येथून करण्यात आली. त्यानंतर रिसोड शहरातील लोणी फाटा, बस स्टँड, वाशिम नाका व सिव्हिल लाईन या मुख्य मार्गाने वॉक व दौड घेऊन सकाळी 08:00 वाजता पोलीस स्टेशन रिसोड येथे दौडीची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमात पोलीस स्टेशन रिसोड येथील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार, विद्यार्थी, पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण तसेच नागरिक असे एकूण 125 ते 150 जण सहभागी झाले होते. या एकता दौडीच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रीय एकता, बंधुभाव व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. तसेच कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटी (Run for Unity) दौड व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटी (Run for Unity) दौड व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 31/10/2026 रोजी सकाळी 08:00 वाजता एकता दिनानिमित्त पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणच्या वतीने ग्राम काटा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात 'रन फॉर युनिटी' (एकता दौड) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात 02 पोलीस अधिकारी, 30 पोलीस अंमलदार, 12 शिक्षक व 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, बंधुभाव व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, वाहतूक नियम व डायल 112 या आपत्कालीन पोलीस हेल्पलाइनबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त रन फॉर युनिटी रॅलीच्या प्रक्षेपणाचे आयोजन

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त रन फॉर युनिटी रॅलीच्या प्रक्षेपणाचे आयोजन

दिनांक 31/10/2026 रोजी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पोलीस स्टेशन अनसिंग येथे 'रन फॉर युनिटी' (एकता दौड) रॅलीचे प्रक्षेपण पाहण्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पोनि संतोष शेळके, पोउपनि कल्लाळे, पोलीस स्टेशन अनसिंग येथील पोलीस अंमलदार तसेच 15 ते 20 विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना राष्ट्रीय एकता, अखंडता व बंधुभावाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

An awareness program was held at Rajiv Gandhi Vidyalaya, Shelgaon Bondade, on the occasion of Ganeshotsav, covering topics such as an essay competition, women's safety, cyber security, mobile phone usage, the 'Dial 112' service, and competitive examinations.

An awareness program was held at Rajiv Gandhi Vidyalaya, Shelgaon Bondade, on the occasion of Ganeshotsav, covering topics such as an essay competition, women's safety, cyber security, mobile phone usage, the 'Dial 112' service, and competitive examinations.

Today, on September 22, 2026, the Shirpur Jain Police Station (Taluka Malegaon, District Washim) organized an essay competition for students in grades 5 through 10 at Rajiv Gandhi Vidyalaya in Shelgaon Bondade, marking the occasion of Ganeshotsav. During the event, guidance was provided on topics such as de-addiction, the safe use of social media and mobile phones, personal safety, the 'Dial 112' service, cyber fraud, cyber security, and competitive examinations. Additionally, necessary instructions related to the Ganeshotsav celebrations were issued. Prizes were distributed to the winners of the essay competition.

Page 1 of 31

PreviousNext