Welfare Activities

पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय #मुस्लिम_समन्वय समितीची बैठक संपन्न झाली असून यावेळी मुस्लिम महिला 12 व पुरुष 15 असे एकूण 27 सदस्य हजर होते. या दरम्यान समितीतील सदस्य यांचे सूचना जाणून घेऊन पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी पोलीस स्टेशन मालेगाव येथे वार्षिक निरीक्षण संबंधाने भेट देऊन पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच पोलिस अधिकारी/ अंमलदार यांचा दरबार घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच कामकाजा विषयी मार्गदर्शन केले.

वाशीम पोलीस तर्फे पो.नि.शेळके व टीमने शिवाजी विद्यालय, वाशिम येथे #स्टुडंटपोलीसकॅडेट कार्यक्रम घेतला. त्यामध्ये डॉ. हरिष बाहेती यांनी व्यसनमुक्ती व PSI स्वाती इथापे यांनी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार गुन्हे व प्रतिबंध तसेच निर्भया पथक विषयी माहिती दिली.

पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी पो.स्टे. मानोरा येथे वार्षिक निरीक्षण संबंधाने भेट देऊन पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच पो.अधिकारी/ अंमलदार यांचा दरबार घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच कामकाजा विषयी मार्गदर्शन केले.

वाशिम पोलीस दलाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे (IPS) यांनी महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

08 मार्च - जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज रोजी महिला दक्षता समितीची बैठक पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे 40 महिला सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. @IPS_Bachchan यांनी महिला सुरक्षिततेसंदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला.

आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर @SP_Washim येथे वाशिम पोलीस येथील महिला अंमलदार करिता 'झुंबा' कार्यशाळेचे आयोजन उमेश फिटनेस स्टुडिओ यांचे वतीने करण्यात आले होते. यावेळी सौ. पोलीस अधीक्षक श्रीमती शिरिषा सिंह यांनी पोषक आहार व निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

वाशीम जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन येथे महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनची सूत्रे महिलांच्या हाती दिली तसेच त्यांचा सत्कार करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी सकाळी 07:30am पोलीस कवायत मैदान येथे PT परेड ला भेट देऊन नवप्रविष्ट पोलीस आणि पोलीस अंमलदार यांचे शारीरिक तंदुरुस्ती बाबत मार्गदर्शन केले. तसेच वाशिम पोलीस दलातील डॉग्स राय आणि बेला यांचे आरोग्य विषयी व शारीरिक तंदुरुस्ती बाबत डॉग्स प्रशिक्षक यांना विचारपूस केली.

पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांचे मार्गदर्शनाखाली शिरोमिनियल परेड घेण्यात आली असून त्यानंतर एकूण 132 पोलीस अंमलदार यांचे शिट रिमार्क नोंदी घेण्यात आल्या व त्यादरम्यान पोलीस अंमलदार यांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले.