Welfare Activities
वाशिम पोलीस दलातील पोलीस अंमलदार जगदीश घरडे ब न 1253 नेमणूक पोलीस मुख्यालय यांनी पॉंडेचरी येथे आयोजित शरीर सौष्ठव मिस्टर इंडिया स्पर्धेत कांस्य पदक मिळविले असून या उत्कृष्ट कामगिरीमुळे वाशिम पोलीस दलाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या निमित्त पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी ताण-तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न,
पोलिस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचे करीता ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली असून याकरिता एकूण 40 पोलीस कुटुंबीय हजर होते. यावेळी पोलीस अधीक्षक श्री @IPS_Bachchan यांनी पोलीस कुटुंबीयांसोबत संवाद साधला आणि त्यांचे अडचणी बद्दल विचारपूस केली.